Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळीची वर्गणी गोळा करण्यासाठी गेले आणि बाहेर आलं सत्य .......

dead body of married woman in home of arnala
, गुरूवार, 17 मार्च 2022 (15:17 IST)
होळीची वर्गणी गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणांना घरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना मुंबईमधील विरारच्या अर्नाळा परिसरात उघडकीस आली आहे. निर्जला इन्द्रेश कुमार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्याच पतीने तिची निर्घृण हत्या केली. 
 
अर्नाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात कारणावरून बिगारी काम करणाऱ्या तिच्या पतीनेच धारधार शस्त्राचा वापर राहत्या घरात तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या तीन आणि पाच वर्षाच्या दोन मुलींना सोबत घेऊन पलायन केलं.
 
होळी सणा निमित्त वर्गणी काढण्यासाठी गावातील तरुण घरोघरी फिरत होते याच दरम्यान त्यांना या दाम्पत्याच्या घरातून कुजलेला वास आला व त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. अर्नाळा सागरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला असून फरार झालेल्या आरोपी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5000mAh बॅटरीसह Realme चा बजेट फोन खरेदी करण्याची संधी आणखी स्वस्त, मिळेल 50 मेगापिक्सेल कॅमेरा