Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय

Decision to give an increased opportunity for MPSC examinationएमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:39 IST)
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी विधान परिषद निवडणुकीमुळे शासन आदेश निघू शकलेला नाही. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचा शासन निर्णय काढला जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी माध्यमांना दिली. करोना परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला एकही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, सरकार त्यांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती. करोनाच्या संकटामुळे हे घडल्याने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने ११ नोव्हेंबरला सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता एक वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागल्याने राज्य शासनाला या संदर्भातील शासन निर्णय काढता आला नाही, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झाडांवर खिळे ठोकणा-यावर गुन्हे दाखल होणार