नीट च्या परीक्षेचा निकाल लागला आहे आता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरु करावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. वैद्यकीय व आयुष्य पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व सूचना वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. सध्या अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. आता नीटच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर वैद्यकीय प्रवेश परीक्षाची प्रक्रिया तातडीने महाविद्यालयाने सुरु करावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करत आहे. देशभरात नीटच्या गुणांवरून एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश होतात. नीटचा निकाल लागून एक आठवडा झाला आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षाही लांबली होती.या मुळे विद्यार्थयांकडून आता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करावी अशी मागणी होत आहे.
या संदर्भात राज्य सीईटी सेलने नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची माहिती, नोंदणी, मान्यता पत्रांची माहिती प्रवेश क्षमताऑनलाईन पद्धतीने नोंदणीच्या लिंकद्वारे भरावी आणि ही संपूर्ण प्रक्रिया लवकर करून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करावी असे सांगण्यात आले आहे.