छत्रपती संभाजी नगर मध्ये महाराष्ट्र पोलीस आयुक्तांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. साहिल असे या मयत तरुणाचे नाव असून तो 17 वर्षाचा असून इयत्ता 12वीत शिकत होता. आयआयटी परीक्षेची तयारी करत होता. साहिल हा एकुलता एक होता.
शनिवारी साहिल ने कुटुंबीय आणि मित्रांसह दसरा साजरा केल्यावर स्नेहनगर भागातील जिज्ञासा बंगल्यावर आई वडिलांसह जेवण केले नंतर मध्यरात्रि तो खोलीत अभ्यासाला जातो असे सांगून निघून गेला. सकाळी त्याचे वडील मॉर्निग वॉकला जात असताना नेहमीच प्रमाणे त्याला उठवण्यासाठी गेले. त्यांना दार आतून बंद असल्याचे लक्षात आल्यावर यांनी बंगल्यातून बाहेर जाऊन खिडकीतून मुलाच्या खोलीत डोकावून पहिले असताना त्यांना तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.
त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आणि त्यांनी तातडीनं पोलिसांना आणि कुटुंबियांना ही माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी दार तोडल्यावर साहिलचा मृतदेह खाली काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. साहिलचे मृतदेह शवविच्छेदनानन्तर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साहिल ने त्याच्या खोलीतीलआरशावर सुसाईड नोट लिहिलेली होती. :मी या जीवनाचा आनंद घेतला असून मी माघार घेत नाही तर मला पुन्हा नवीन सुरु करायचे आहे, आय लव्ह यु बोथ असे लिहिले आहे.
वेदांतनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्याने हे टोकाचे पाऊल का घेतले याचा शोध करत आहे.