Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2017 (10:46 IST)
रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा, माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावेळी विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देण्यासाठी मुख्यमंत्री  यांच्या अध्यक्षतेखाली  वर्षा निवासस्थानी समितीची बैठक झाली.  रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा 607 कोटी रुपयांचा असून पर्यटकांना/नागरिकांना किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पध्दतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पध्दतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे. म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा 438 कोटी 44 लाख रुपयांचा असून रस्ते विकास, सुलीभंजन आणि म्हैसमाळ करिता पाणी पुरवठा तसेच मल:निस्सारण, लघु प्रकल्प बांधकाम/साठवण क्षमता वाढवणे, धर्मशाळा बांधणे व हौज-ए-खास, पांगरा आणि धरम तलावांचे सुशोभीकरण करणे, माहिती केंद्र, स्वच्छता गृह, वाहनतळ, पर्यटक निवास, बनी बेगम बाग, खुलताबाद, निजामशाहची कबर, मालोजीराजे भोसले गढी, वेरुळ इ. संरक्षित स्मारकांचे संवर्धन व जोपासना आदी कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा 216 कोटी 13 लाख रुपयांचा असून मंदिराकडे जाणारे रस्ते, सांडपाणी  व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर विजेची सोय तसेच भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भक्त निवास आदी उभारण्यात येणार आहे. तसेच माहूर देवस्थान येथील वन विभागाच्या 10 हजार हेक्टरमध्ये रोहयोच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा 93 कोटी 46 लाख रुपयांचा असून दुर्गा टेकडी येथे रिसर्च सेंटर, प्रयोगशाळा, पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय बांधणे, सरोवराभोवती सुरक्षा कक्ष, पदपथ, व्हुयविंग प्लॅटफॉर्म, सूचनाफलक, प्रदूषणविरहित बसेस व परिसर सुशोभीकरण करणे, ऐतिहासिक मंदीराचे संवर्धन करणे, प्रथमोपचार केंद्र, ध्यानसाधना केंद्र, प्रतीक्षागृह, प्रयोगशाळा व सभागृह, शासकीय इमारतीचे रुपांतर, क्लॉक रुम इत्यादी कामांचा समावेश आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी म्हणाले- राहुल गांधींना माहित आहे की महाराष्ट्रात कधीही MVA सरकार स्थापन होणार नाही

परवानगी न मिळाल्याने मनसेने शिवाजी पार्क रॅली रद्द केली, का खास आहे Shivaji Park

अमित शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील हिंगोलीत केली तपासणी

LIVE: राहुल गांधींना माहित आहे की महाराष्ट्रात कधीही MVA सरकार स्थापन होणार नाही

23 नोव्हेंबर नंतर महायुती नाही तर महाआघाडी येणार!- संजय राउत

पुढील लेख
Show comments