Festival Posters

धुळे येथील मृतांना ५ लाख मदत, जमावातील २३ अटकेत

Webdunia
मंगळवार, 3 जुलै 2018 (08:44 IST)
राज्याला हादरवून सोडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील मारहाण प्रकरणी मृत्यूमुखी पडलेल्या पाचही जणांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील ट्रॉलीच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना ही मदत जाहीर केली. सोशल मीडीयातील अफवेमुळे काल, १ जुलै रोजी धुळ्यातील राईनपाड्यात मुलं पळवण्याच्या संशयातून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. गावकऱ्यांनी मिळून त्या संशयीतांना जीव जाईपर्यंत मारले होते. या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त होत होती. त्याचीच दखल घेत आज मुख्यमंत्र्यांनी त्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली.राईनपाडा गावात मुलं पळवणारी टोळी शिरल्याची अफवा पसरल्यावर सोलापूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पाच जणांना गावात जमावानं अमानुष मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आणखी काहींची ओळख पटल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या गावकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं रवाना केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर गावात शांतता पसरली असून गावातील पुरुष फरार असल्याचे समजते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार

PM Kisan Maandhan Yojana लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, वृद्धापकाळात मासिक पेन्शन मिळणार!

आता तुमची इलेक्ट्रिक स्कूटर स्मार्टफोनप्रमाणे अपडेट होईल! OTA अपडेट्समुळे तुमच्या वाहनाची रेंज आणि वेग कसा वाढतो ते जाणून घ्या

उत्पन्नात घट होण्याची शक्यता, हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली

यवतमाळमध्ये मासिक वेतनाच्या मागणीसाठी परिचारिकांचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुढील लेख
Show comments