Dharma Sangrah

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच स्मारकाचे काम पूर्ण केले नाही - मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:41 IST)
भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केल्याची टीका त्यांनी केली. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही. नागपूर येथील भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.
 
फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीलाही लक्ष्य केले. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे.असे फडणवीस यांनी मत यक्त केले.मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. निधीही मोठ्याप्रमाणात दिला. २०२० पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार २०,५५२ कोटी रुपयांची मदत देणार, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठी घोषणा

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते का, आजच या 3 सेटिंग्ज बदला

"उद्धव ठाकरे आणि शिंदे यांनी आपले मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावे," महायुतीच्या ज्येष्ठ नेत्याचे भावनिक आवाहन

Mahindra XUV700 vs Tata Safari: सुरक्षितता आणि मायलेजच्या बाबतीत कोणती चांगली आहे फरक जाणून घ्या

4, 4, 4, 6, 6 - वैभव सूर्यवंशीने तोडला विश्वविक्रम, 11 चेंडूत अर्धशतक ठोकले

पुढील लेख
Show comments