Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीडमधील सरपंचाच्या हत्येतील आरोपींची मालमत्ता जप्त होणार, देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले निर्देश

Webdunia
रविवार, 29 डिसेंबर 2024 (15:14 IST)
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सीआईडीला दिले आहे. गृह विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती शनिवारी दिली. तसेच ज्या लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे अशा लोकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.   

मुख्यमंत्री आणि गृहमन्त्रालयाची पदे स्वीकारल्यानंतर महिन्याच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्या प्रकरणी विरोधक हल्लाबोल करत आहे. या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिस सीआईडी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सीआईडीला खूनाच्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले आहे. 
या प्रकरणात शनिवारी राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत बीड मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि स्थानिक नेते उपस्थित होते. 
ALSO READ: अबू आझमी यांची बीएमसी निवडणुक एकट्याने लढण्याची घोषणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात पवनचक्की उभारणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून खंडणीच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे देशमुख यांची हत्या करण्यात आली.

ही घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली, त्यावेळी संतोष देशमुख हे त्यांचे चुलत भाऊ शिवराज देशमुख यांच्यासोबत टाटा इंडिगो कारमधून मसाजोग गावाकडे जात असताना वाटेतच काही लोकांनी त्यांची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी थांबवली आणि सहा जणांनी कार मधून उतरून सरपंच संतोष यांना गाडीतून बळजबरी काढून पळवून नेले नंतर त्यांचा मृतदेह केज तालुक्यातील दाहितना फाटा येथे सापडला 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

मंगळसूत्र की सिंदूर... पाकिस्तानवरील हल्ल्यापूर्वी मोहिमेच्या नावावर चर्चा, नंतर पंतप्रधान मोदींनी 'Operation Sindoor'ला अशी मान्यता दिली

LIVE: घाटकोपर होर्डिंग प्रकरण: चौकशी समितीने मुख्यमंत्री फडणवीस यांना अहवाल सादर केला

पाकिस्तानी एयर डिफेंस यूनिट सिस्टम नष्ट, ड्रोनने हल्ला

एलन मस्कला मिळाली मंजुरी, आता भारतात सॅटेलाइटच्या मदतीने चालेल इंटरनेट, कसे काम करेल ते जाणून घ्या?

पुण्यात स्कूटरवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता आरोपी पती

पुढील लेख
Show comments