Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नव्या मुख्यमंत्र्याबाबत महाराष्ट्रात सस्पेन्सला ब्रेक, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी

Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2024 (11:47 IST)
Devendra Fadnavis is the new Chief Minister of Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होऊन अवघ्या 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
  
तसेच प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. मुंबईत होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.   

<

???? 10.40am | 4-12-2024????Vidhan Bhavan, Mumbai | स. १०.४० वा. | ४-१२-२०२४????विधान भवन, मुंबई.

???? BJP Core Committee Meeting chaired by Hon Union Finance Minister Nirmala Sitharaman ji and Senior leader Vijaybhai Rupani ji
???? मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणजी व ज्येष्ठ नेते… pic.twitter.com/EhDvn3I5oO

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2024 >या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार होती. आज भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. यावेळी महायुतीने महाराष्ट्राची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

फडणवीस उद्या शपथ घेणार-
देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील. उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे. याशिवाय भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्यात दिसणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. 

महाराष्ट्र भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी मुंबईत कोअर कमिटीची बैठक झाली, या बैठकीत निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, देवेंद्र फडणवीस विशेषत: निरीक्षक म्हणून उपस्थित होते. आता देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्यांच्या नावाला भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी मुंबईत कोअर कमिटीची बैठक झाली, या बैठकीत निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, देवेंद्र फडणवीस विशेषत: निरीक्षक म्हणून उपस्थित होते. आता देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्यांच्या नावाला भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
 
यानंतर लगेचच महायुतीच्या आघाडीची बैठक होत असून, त्यात लवकरच महायुतीकडूनही अधिकृत मंजुरीची शिक्कामोर्तब होणार आहे. यानंतर ते आपल्या समर्थकांसह दुपारी 3.30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन घोषणा करणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. उद्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील आझाद मैदानावर फक्त दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेकडून एकनाश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार या दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन उपमुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि पुन्हा सरकार स्थापन करतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments