Dharma Sangrah
✕

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट ,आंदोलन करु नका, अशी केली मागणी

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:57 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून येत्या ३० जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर अण्णांनी हे आंदोलन करुन नये, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट घेत आंदोलन करु नका, अशी मागणी केली आहे. तुमचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवतो, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना दिला आहे. यावेळी गिरीश महाजन, विखे-पाटील आदी उपस्थित होते.
 
यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्याबाबत त्यांची काही मते आहेत. या सर्व गोष्टी आम्ही केंद्राजवळ मांडणार आहोत. कारण अण्णा हजारे केवळे एक व्यक्ती नाही आहेत. तर या महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व आहे. ते महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे नेहमी स्वत:साठी नाही तर समाजासाठी नेहमी लढत असतात. त्यामुळे आमची सर्वांचीच अशी एक अपेक्षा आहे की, त्यांचे जे काही विषय आहेत ते मार्गी लागावे. जेणेकरुन त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ नये. तसेच त्यांची जी काही मते आहेत ती केंद्र सरकार पुढे मांडू. यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही’.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

हिंदू मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून विकल्याप्रकरणी नालासोपारा येथील जिम ट्रेनरला अटक; मोबाईलमध्ये ८० क्लिप्स सापडल्या

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा शुल्क माफ

'पूर्ण पगार देण्याचा दबाव'; पुण्यात ३३ वर्षीय आयटी इंजिनिअरची आत्महत्या, पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

IND vs WI 4th T20I: वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना २४ धावांनी जिंकला

APJ Abdul Kalam Birth Anniversary: डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती

पुढील लेख
Show comments