Festival Posters

भाजपच्या सरकारला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा विसर

Webdunia
बुधवार, 21 मार्च 2018 (15:04 IST)

ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्याच भाजप व शिवसेनेच्या सरकारला आता त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली.मागील तीन वर्षांच्या अधिवेशनाच्या कालावधीत सभागृहात वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी औरंगाबाद येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला अद्याप निधी उपलब्ध का करून दिला नाही, याबाबत विचारणा केली. मात्र सरकारने याबाबत अजूनही उत्तर दिलेले नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आणि राज्यपालांच्या अभिभाषणात स्व. मुंडे यांच्या स्मारकाचा उल्लेख नव्हता. याचाच अर्थ या सरकारला स्व. मुंडे यांचा विसर पडला आहे, असेही ते म्हणाले.मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक अध्यासन विभाग सुरू केला. उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विभागाला १५० कोटी अनुदानाची घोषणा केली, मात्र त्या अध्यासनाला एकही रूपयाचे सहकार्य अद्याप करण्यात आलेले नाही, याबाबत मुंडे यांनी खंत व्यक्त केली.याशिवाय, या सरकारने परळीत २०१४ साली स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उसतोड कामगार महामंडळाची स्थापना केल्याची घोषणा केली, पण या महामंडळालाही अजूनपर्यंत अनुदानाची तरतूद केली गेलेली नाही, हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

रेडमी आज आपला नवीन शक्तिशाली स्मार्टफोन, रेडमी टर्बो 5 लाँच करणार

जयपूरमध्ये अभिजीत दीपके वरील हल्ल्या प्रकरणी रोहिणी खडसे यांचा मोठा दावा

LIVE: ज्यांना जायचे आहे, त्यांनी आनंदाने जावे, उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

ज्यांना जायचे आहे, त्यांनी आनंदाने जावे, उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी: नीट पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments