Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले - धनंजय मुंडे

dhananjay munde
सध्या देशभरातच कांद्याचे भाव पडले आहेत. राज्यातही कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. भाव पडल्याने शेतकरी संतप्त आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. मदतीच्या नावाखाली पुन्हा एकदा #कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना या सरकारने फसवलंय. सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलंय, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली आहे.
 
या सरकारने २०१६ मध्ये शेतकऱ्यांना १ रुपयाचं अनुदान दिले होते. ते अनुदानही अद्याप कुणाला मिळालेलं नाही. शेतकऱ्यांची मागणी ५०० रुपयांची असताना सरकार अनुदान देतंय अवघे २ रुपये... ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आम्ही हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर येत्या आठवड्यात शेतकऱ्यांसह आंदोलन करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. सरकारने देऊ केलेली मदत समाधानकारक नाही, होणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी, अशी मुंडे मागणी यांची भूमिका आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संपामुळे पाच दिवस बँक बंद