Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे स्वत: धनंजय मुंडे यांनी सांगितले

Dhananjay Munde himself said that he had inquired about the health of Pankaja Munde पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे स्वत: धनंजय मुंडे यांनी सांगितलेMarathi Regional News In Webdunia Marathi
, सोमवार, 3 जानेवारी 2022 (20:59 IST)
सध्या राज्यात ओमायक्रॉन रुग्णाचे प्रमाण वाढत असून, सातत्याने नवे बाधित समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर येताच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आपण पंकजा यांना मेसेज करून काळजी घेण्याचे सांगितल्याचे, स्वत: धनंजय मुंडे यांनीच स्पष्ट केले. खरं तर जेव्हा-जेव्हा मानसिक आधार देण्याची गरज पडली तेव्हा धनंजय मुंडे यानं राजकारणा पलिकडे जाऊन भावाची भूमिका निभावली. तसेच पंकजा मुंडे यांनीदेखील राजकारणापलीकडे जाऊन बहिणीची भूमिका निभावली आहे.
वास्तविक राजकारण करत असताना दोघांनीही नेहमीच एकमेकांवर कठोर शब्दात टीका केली आहे. मात्र कौटुंबिक संबंधही जपल्याचे महाराष्ट्राने बगितले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे कळताच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. पंकजा मुंडेंना करोना झाला आहे, तुम्ही त्यांना फोन केला का? असा प्रश्न पत्रकारांनी करताच धनंजय मुंडे म्हणाले, मी पंकजाताईला फोन करू शकलो नाही, मात्र मेसेजद्वारे सांगितलं की तुला दुसऱ्यांदा करोना झाला आहे. करोना काळात काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. विशेषतः पोस्ट कोविड त्रास जास्त असतो. अशावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला मेसेज केला की काळजी घेतली पाहिजे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातलं राजकीय वैर महाराष्ट्र वेळोवेळी पाहत असतो. हे दोघे एकमेकांवर सतत राजकीय हल्ले प्रतिहल्ले करत असतात. मात्र या दोघांनीही राजकारण आणि आपलं नातं या गोष्टी स्वतंत्र ठेवलेल्या वारंवार दिसून येतात. पहिल्या लाटेदरम्यान ज्यावेळी दोघांनाही करोनाची लागण झाली होती, तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा या दोघांमधलं प्रेम पाहायला मिळालं.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मधल्या काळात निर्बंध शिथिल झाले, सण उत्सव साजरे करण्यात आले, करोना रुग्णसंख्याही कमी होत होती. या सगळ्यामुळे आपण काहीसे निर्धास्त झालो, मात्र करोनाला हलक्यात घेणं चुकीचं आहे. करोना अध्याप संपलेला नसून नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळावेत, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाजार तळात गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून