Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मरता कौन है म्हणत धनंजय मुंडे यांचा प्रचारात सहभाग

dhananjay munde
, शनिवार, 28 जानेवारी 2023 (20:22 IST)
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातामुळे त्यांना दुखापत झालेली आहे.  त्यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम वसंतराव काळे यांच्या प्रचारासाठी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले आहे. त्यांच्या या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या निवडणुकीमध्ये विक्रम काळे यांचाच विजय होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ते शिक्षक परळी वैजनाथ येथील प्राध्यापक मेळाव्यास संबोधित करत होते.
 
भारतीय जनता पार्टीला तसेच इतर उमेदवारांच्या सात पिढ्यांनाही विक्रम काळे कसे जिंकणार हे समजणार नाही. विक्रम काळे यांना तीन वेळा निवडणून दिलेले आहे. चौथ्या वेळेसही ते निवडून येतील. कोण कोण आणि कोठून कसे मतदान करते हे फक्त मतदारांनाच माहिती असते. संस्थाचालकांना माहिती असते. आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. मतदार विक्रम काळे यांनाच मत देतात, हा माझा अनुभव आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले.
 
“राह मे खतरे कितने भी हो लेकीन डरता कौन है. मौत कल आती है, आज आ जाए डरता कोन है. तेरे लष्कर के मुकाबले मै अकेला हूँ, फैसला मैदान मे होता है, मरता कौन है,” असेदेखील मुंडे शायराना अंदाजात म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावा