Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनंजय मुंडे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार चर्चेला उधाण

dhananjay munde
, रविवार, 2 मार्च 2025 (15:34 IST)
सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडी कडून 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. खंडणीच्या प्रकरणातून ही हत्या करण्यात आली.
ALSO READ: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडे सोमवारी राजीनामा देण्याची  पोस्ट करुणा शर्मा यांनी केली आहे. 
सोमवार पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सुरु आहे त्यापूर्वी धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार असल्याची माहिती करून शर्मा यांनी फेसबुक पोस्टवरून दिली आहे. 
त्या म्हणाल्या, मला दोन दिवसांपूर्वी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे दोन दिवसांपूर्वी त्यांचा राजीनामा लिहिला आहे. धनंजय मुंडे म्हणाले होते की, वाल्मिक कराड चौकशीत दोषी आढळला तर मी राजीनामा देईन. त्यामुळे धनंजय मुंडे आता सोमवारी शंभर टक्के राजीनामा देणार आहे. अजित दादा त्यांना मंत्रिमंडळातून काढतील अशी माहिती मला मिळाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दोघांना अटक