Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिव्यांगाना सरकारी नोकरीमध्ये ४ टक्के आरक्षण

Webdunia
शुक्रवार, 31 मे 2019 (09:44 IST)
दिव्यांगाना सरकारी नोकरीमध्ये ४ टक्के आरक्षण मिळणार आहे. केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या दिव्यांगांना सरकारी नोकर भरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली. बुधवारी त्या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. या निर्णयामुळे अंध/अल्पदृष्टी, कर्णबधीरता, अस्थ‍िव्यंग, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायु विकृती, स्वमग्नता, मंदबुध्दी, मानस‍िक आजार अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत.
 
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले की, दिव्यांगाचा लाभ घेवू इच्छ‍िणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. दिव्यांग व्यक्तींसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष निश्च‍ित करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनावरील प्रत्येक संवर्गासाठी दिव्यांग व्यक्ती सरळ सेवा भरतीच्या पदासाठी १०० बिंदू नामावलीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या वर्षी दिव्यांग उमेदवार न मिळाल्यास त्या जागेचा अनुशेष पुढील वर्षीच्या नोकर भरतीत ठेवावा असाही निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments