Dharma Sangrah

सोमवारपासून अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टारांचा बंद

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (21:54 IST)
अहमदनगर तीसगाव (ता. पाथर्डी) येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश म्हस्के यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून (18 एप्रिल) जिल्ह्यातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्यात येतील, असा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन हा इशारा दिला आहे.
यावेळी अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, राज्य सदस्य डॉ. निसार शेख, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, उपाध्यक्ष डॉ सागर झावरे, डॉ अमित करडे, डॉ. अशोक नरवडे, डॉ. गणेश बडे,
 
डॉ. अशोक पाटील, डॉ. मिश्रा, डॉ. केसरी, डॉ. सुनील साबळे, डॉ.श्वेता भालसिंग ,डॉ. सुरेंद्र रच्चा उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील शुक्रवारी तिसगाव येथे डॉ. नीलेश म्हस्के यांच्या वर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
 
गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु आजतागायत गुन्हेगारांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे जर या पवार नावाच्या केडगाव मधील आरोपींना अटक करण्यात आली नाही,
 
तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व रूग्णालये, क्लिनिक, अत्यावश्यक रूगणसेवासुद्धा, सोमवारपासून सुरक्षेअभावी बेमुदत बंद ठेवण्यात येईल. भयमुक्त वातावरणात काम करता येणे हा सर्व डॉक्टर्सचा मुलभूत अधिकार जर डावलण्यात येत असेल तर हे पाऊल उचलावेच लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

ब्राझीलमधील UN हवामान परिषदेच्या ठिकाणी आग लागली, 13 जण जखमी

LIVE: महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सागर गोरखेला जामीन मंजूर

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले

शुभमन गिलच्या जागी ऋषभ पंतची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

पुढील लेख
Show comments