Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबईच्या डोंबिवलीत सापांसोबत TikTok व्हिडीओ, व्हायरल झाल्यावर दोघं ताब्यात

मुंबईच्या डोंबिवलीत सापांसोबत TikTok व्हिडीओ, व्हायरल झाल्यावर दोघं ताब्यात
सापांचं चुंबन घेताना, त्यांना हातात घेऊन फिरताता असे टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशा वेडेपणामुळे तरुणांचा जीव धोक्यात असल्याचं समोर येत आले आहे.
 
अशात मुंबईच्या डोंबिवलीच्या कुणाल लांडगे आणि त्याच्या एका अल्पवयीन मित्राने सापासोबत व्हिडिओ तयार केले. व्हिडिओत ते सर्पाचं चुंबन घेताना आणि हातात बिंदास घेऊन फिरताना दिसत आहे. तसं तर हा व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लेटफॉमहून काढण्यात आला आहे. 
 
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर याबद्दल वन विभागाला तक्रार मिळाल्यावर दोघांना ताब्यात घेतले गेले आहे.
 
तसेच वन विभागाच्या एका अधिकार्‍याप्रमाणे व्हिडिओत दर्शवण्यात आलेला साप विषारी असून त्याच्या दंशामुळे मृत्यू होऊ शकतो. चौकशीत त्यांनी अनेक विषारी सापांसोबत स्टंट केल्याचे समोर आले आहे.
 
भरत केणे नावाच्या व्यक्तीने त्यांना साप पकडणे शिकवले असल्याची माहिती मिळाली असून चौकशी केली जात आहे की साप कुठून पकडला आणि नंतर काय केले. त्यांनी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ अपलोड केल्याचे कळून आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिगारेट जाळू नका म्हटल्यावर त्याने महिलेसमोर काढली पँट