Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चला मराठवाड्याला वाळवंट होण्यापासून वाचवूया

drought in marathwada
, गुरूवार, 31 मे 2018 (17:21 IST)
’चला मराठवाड्याला वाळवंट होण्यापासून वाचवूया’असा मंत्र घेऊन गनिमी कावा यास संघटनेने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात परिषदेत तज्ञांचं अनुभवकथन मार्गदर्शन आणि आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. ऊसाच्या शेतीने मोठ्या प्रमाणावर पाणी घेतले, घत आहेत. यावर कारखाने चालतात, राजकारणी गबर होतात मात्र ऊस उत्पादकाला फारसं काही मिळत नाही. यात अर्थकारण नव्हे तर राजकारण आहे असा स्पष्ट आरोप तज्ञ एचएम देसरडा यांनी केला.
 
पावसाचा स्वभाव बदललेला आहे. या एका वाक्यामुळे जलव्यवस्थापनावर काम करण्याची संधी मिळाली. पावसाचा आभ्यास केला पाहिजे. पावसाच्या पध्द्तीत झालेले बदल आणि जनसामान्यांच्या जिवनात झालेले परिणाम आत्मसात करणाची गरज आहे. असे प्रतिपादन भारतीय जल संस्कृती मंडळाचे आध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी केले.
 
डॉ. जनार्दन वाघमारे यांनी अण्णा हजारे यांच्या कामांचा हवाला देत पावसाचा प्रत्येक थेंब जिरवायला हवा असे आवाहन केले. मराठवाड्याचे वाळवंट होणार असे अभ्यासक सांगतात. ही परिस्थिती येऊ असा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली. ही सुरुवात आहे. यापुढे गनिमी कावामार्फत सातत्याने विविध उपाय योजना केल्या जातील असे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, सुभाषराव जावळे, अवधूत चव्हाण, सुनिल साखरे, तुकाराम शेळके उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डीएसके यांच्या मेहुनीची तुरंगात चौकशी