नागपुरात रविवारी संध्याकाळी एका लष्करी अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत 25 ते 30 जणांना धडक दिली. या मध्ये नागरिक जखमी झाले.
अपघातानंतर संतप्त लोकांनी वाहन चालकाला मारहाण केली. त्याला अटक करण्यात आली. या जवानाचे नाव हर्षपाल महादेव वाघमारे(40) राहणार रामटेक असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालक आसाममधील भारतीय सैन्यात जवान आहे. 3 -4 दिवसांचा रजेवर गावी आला असून रात्री 8:30 च्या सुमारास नगरधनमधील दुर्गा चौकातून हमलापुरीकडे जात असताना त्याने मद्यपान केले असून तो बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने काही सेकंदात लोकांना धडक दिली. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पालटून नाल्यात पडले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांच्या मोठ्या जमावाने त्याला नाल्यातून बाहेर काढले आणि मारहाण केली.
पोलिसांनी लष्करी जवानाला अटक केली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पोलीस पुढील तपास करत आहे.