Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारूच्या नशेत त्याने दाताने केले सापाचे तुकडे, परिस्थिती गंभीर

drunken youth bite snake in UP
नशा केल्यावर लोकं विचित्र वागू लागतात, विचित्र कृत्य करतात आणि अशात आपला जीव धोक्यात टाकतात. अशीच एक घटना उत्‍तर प्रदेशाच्या एटा येथे घडली, जेथे नशेत एका युवकाला सापाने चावले, नंतर जखमी तरुणाने साप हातात धरून आपल्या दाताने चावून त्याचे तुकडे केले.
 
बातमीप्रमाणे, रविवारी रात्री उत्तर प्रदेशाच्या एटा जिल्ह्यात असरौली गावात एका विषारी सापाने एका दारूच्या नशेत असलेल्या तरुणाला दंश केले. त्याला जसंच साप चावल्याची जाणीव झाली त्याने लगेच सापाला हातात धरून त्याला आपल्या दाताने चावून त्याचे खूप तुकडे केले, ज्याने सापाचा जागीच मृत्यू झाला. नंतर तरुण घरी पोहल्यावर बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
उल्लेखनीय आहे की यापूर्वी देखील मध्‍य प्रदेशाच्या मुरैना जिल्हयाच्या पचेर गावात अशीच विचित्र घटना घडली होती. येथे देखील दारूच्या नशेत एका तरुणाने आपल्या शेतात साप बघून त्याला धरले आणि चावले होते. नंतर तरुण तर वाचला पण सापाचा मात्र मृत्यू झाला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टेस्ट मॅचेसचा वर्ल्ड कप होतोय! 'काय?'