suvichar

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेयांच्यावर गुन्हा दाखल

Webdunia
मंगळवार, 11 एप्रिल 2017 (12:13 IST)
पुण्यातील भोसरीतील औद्योगिक क्षेत्रातील भूखंड कमी किमतीत मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 
 
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 13 (1) ड, (2), 15 आणि भादंवि 109 प्रमाणे एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, जागा मालक उकाणी आणि इतर अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली करा, असे आदेश 8 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणातील तक्रारदार हेमंत गावंडे यांनी 30 मे 2016 रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जालाच फिर्याद समजावी आणि प्रकरणाचा तपास करावा, असा आदेश आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

बीसीसीआयने नमन पुरस्कारांची घोषणा केली, शुभमन गिल ,स्मृती मानधना यांना क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार

LIVE: मुंबई लोकल प्रवाशांना सतर्कता, रविवारी अनेक मार्गांवर मेगा ब्लॉक

अरिना सबालेंकाने लिंडा नोस्कोवाला हरवून अंतिम फेरी गाठली

गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांची कोठडीतून सुटका करण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments