Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकविरा देवीचा कळस चोरीला

eakveera devi
, मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:25 IST)

देश आणि राज्यातील अनेक भक्त असलेल्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराला बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. ही चोरी  सोमवारी रात्री झाली आहे. यामध्ये चोरांनी  मंदिराला तीन वर्षापूर्वी भाविकाने सोन्याचा कळस अर्पण केला होता. यामध्ये चोरी झालेल्या कळसाची किंमत सव्वा लाख रुपये आहे. एकविरा देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.चोरीची घटना घडली आणि हे सर्व  मंगळवारी  उघड झाले आहे. यामध्ये असे की मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानिक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी यांच्या स्वप्नातील देशातील महाराष्ट्राला “स्वच्छता ही सेवा”पुरस्कार