Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

Webdunia
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (14:54 IST)
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय चलनासंदर्भातल्या फेमा कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात आली. मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. अविनाश भोसलेंच्या ईडी चौकशीची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. 
 
अविनाश भोसले यांची मुंबईतील ईडी कार्यालयात पाच तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सकाळी १० वाजता भोसले ईडी कार्यालयात पोहोचले होते. चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  
 
ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते.दरम्यान, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. यापूर्वीही अनेक कारणांनी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात भोसले यांचा दबदबा राहिला आहे. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नवीन

भुलेश्वरचा राजाच्या मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान गणेश मूर्ती कोसळली, २ जणांचा मृत्यू

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पुण्यातील 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर हल्लाबोल केला प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हटले

जपानमध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप, २० जण जखमी, एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन सेवा विस्कळीत

भारतीय हॉकी संघ नेदरलँड्सकडून ३-१ ने पराभूत

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना कोलंबोत होणार

पुढील लेख
Show comments