Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित

Eknath Khadse
, बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:22 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.  त्यांच्यासमवेत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.
 
या बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे. खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस मीसुद्धा उपस्थित होतो. राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात लवकरच पत्रकाराना माहिती देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील ४ कोव्हिड केअर सेंटर आणि ९ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद होणार