नाशिकच्या सटाणा येथे आयोजित सभेत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बद्दल भाष्य केले. लाडकी बहीण योजना माझी सर्वात आवडती योजना असून एकनाथ शिंदे कधीही ही योजना बंद पडू देणार नाही. असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने शेतकरी, तरुण तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.
लाडकी बहीण योजनाने मोठा इतिहास रचला आहे. विरोधकांनी सरकार बनवले पण जनतेने त्यांना नाकारले. विरोधकांनी या योजनेचा विरोध करत कोर्टात गेले. मात्र लाडक्या बहिणींनी त्यांना घरी पाठवले.
मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरु केली . एकनाथ शिंदे असे पर्यंत ही योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी लाडक्या बहिणींना दिला. लाडक्या बहिणींना येणारे 1500 रुपये देऊन थांबणार नाही. त्यांना स्वावलंबी बनवणार. मी खोटे बोलणार नाही, माझी भूमिका स्पष्ट विकास असून गोरगरिबांच्या जीवनात आनंद आणायचे काम करायचे आहे.
शिंदे पुढे म्हणाले ,स्वार्थ आमचा अजेंडा नाही, खुर्चीवर ज्यांनी बसविले त्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळतो. शेतकरी कुटुंबातील मी आहे, मुख्यमंत्री झालो. यावर काही लोकांच्या पोटात दुखले.
शिंदे म्हणाले, “कचरा मुक्त सटाणा हवा असेल तर धनुष्यबाणशिवाय पर्याय नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते, पर्यटनविकास आणि स्थानिक कामांसाठी भरघोस निधी दिला आहे. नळपट्टी आणि घरपट्टीचा अवाजवी भार जनतेवर टाकला जाणार नाही. सटाण्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे.”