Dharma Sangrah

लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला

Webdunia
मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 (08:24 IST)
नाशिकच्या सटाणा येथे आयोजित सभेत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बद्दल भाष्य केले. लाडकी बहीण योजना माझी सर्वात आवडती योजना असून एकनाथ शिंदे कधीही ही योजना बंद पडू देणार नाही. असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. 
ALSO READ: मुंबईच्या मतदार यादीवर वाद, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत विरोधकांचा हल्लाबोल
शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने शेतकरी, तरुण तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.
लाडकी बहीण योजनाने मोठा इतिहास रचला आहे. विरोधकांनी सरकार बनवले पण जनतेने त्यांना नाकारले. विरोधकांनी या योजनेचा विरोध करत कोर्टात गेले. मात्र लाडक्या बहिणींनी त्यांना घरी पाठवले. 
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या अफवा फेटाळून लावल्या
मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरु केली . एकनाथ शिंदे असे पर्यंत ही योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी लाडक्या बहिणींना दिला. लाडक्या बहिणींना येणारे 1500 रुपये देऊन थांबणार नाही. त्यांना स्वावलंबी बनवणार. मी खोटे बोलणार नाही, माझी भूमिका स्पष्ट विकास असून गोरगरिबांच्या जीवनात आनंद आणायचे काम करायचे आहे. 
ALSO READ: मुंबई लोकल ट्रेनचे नियमित डबे एसी कोचने बदलले जातील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
शिंदे पुढे म्हणाले ,स्वार्थ आमचा अजेंडा नाही, खुर्चीवर ज्यांनी बसविले त्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. 
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळतो. शेतकरी कुटुंबातील मी आहे, मुख्यमंत्री झालो. यावर काही लोकांच्या पोटात दुखले.
 
शिंदे म्हणाले, “कचरा मुक्त सटाणा हवा असेल तर ‘धनुष्यबाण’शिवाय पर्याय नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते, पर्यटनविकास आणि स्थानिक कामांसाठी भरघोस निधी दिला आहे. नळपट्टी आणि घरपट्टीचा अवाजवी भार जनतेवर टाकला जाणार नाही. सटाण्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे.”
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही एकनाथ शिंदे

नागपूर शहर बस संप महानगरपालिका प्रशासनाने माघार घेतली

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

अमरावतीच्या तिवासा तहसीलमधील शिवणगाव-बेनोडा भागात भूकंपाचे धक्के जाणवले

पटणामध्ये तिहेरी हत्याकांड; व्यापाऱ्याची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना लोकांनी बेदम मारहाण करून केले ठार

पुढील लेख
Show comments