Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा खालावली,रुग्णालयात दाखल

Webdunia
मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (16:26 IST)
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने मंगळवारी त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिंदे यांना गेल्या आठवड्यापासून घशाचा संसर्ग आणि तापाचा त्रास होता. आपल्या प्रकृतीबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, “सगळं ठीक आहे.” "मी ठीक आहे, काळजी करू नका," शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आले.
ALSO READ: महाराष्ट्रातील या गावात बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान रद्द
शिवसेनाचे नेते उदय सामंत म्हणाले, ही त्यांची नियमित तपासणी होती. नंतर ते पुन्हा वर्षा बंगल्यावर परततील.त्यांना घशाचा संसर्ग, ताप आणि अशक्तपणा जाणवत आहे .त्यांच्या रक्ताची तपासणी घेण्यात येणार आहे. 
ALSO READ: एकनाथ शिंदे सभांमध्ये नसल्याने संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रात महायुती खेळ खेळत आहे
भारतीय जनता पक्ष (भाजप) 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत व्यस्त आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शपथविधीच्या तयारीबाबत चर्चा केली. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

अंबरनाथ मध्ये विजेचा धक्का बसून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

धुळ्यातील सरकारी अतिथीगृहातून सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकरण बाबत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: 'पंतप्रधान मोदींच्या देशभक्तीवर शंका घेऊ नका' म्हणत शिंदे राहुल गांधींवर संतापले

मानवी कवट्यांपासून सूप बनवून पिणारा सिरीयल किलर तांत्रिकला जन्मठेपेची शिक्षा

गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार

पुढील लेख