Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात घुसून वृद्धाची गळा चिरून हत्या, नागपूरची घटना

murder
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (11:45 IST)
मंगळवारी कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत एका वृद्ध व्यक्तीच्या घरात दिवसाढवळ्या कोणीतरी घुसून हत्या करण्यात आली. चोरी किंवा वैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.
ALSO READ: ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून कांग्रेसचा हल्लाबोल
कोराडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांचा शोध सुरू आहे. मृताचे नाव पापा शिवराम मडावी (६५) असे आहे. ते दुर्गा नगर येथील रहिवासी आहेत.

पापा मडावी हे निवृत्त सरकारी शिक्षक होते. त्यांची पत्नी लोकांकडे जेवण बनवायला जाते. मुलगा आणि मुलगी दोघेही खासगी नौकरी करतात.मंगळवारी घरात कोणीही नव्हते फक्त पापा घरी  एकटे होते. दुपारी 1 ते 4 दरम्यान कोणीतरी घरात शिरले आणि त्याने चाकूने मडावी यांचा गळा चिरला.
ALSO READ: ठाण्यात सहकाऱ्याची हत्या करून फरार आरोपीला जम्मू-काश्मीरमधून अटक
दुपारी 4 वाजता त्यांची पत्नी घरी आल्यावर त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत पतीला पाहून धक्क झाली आणि तिने मुलाला फोन करून ही माहिती दिली. मुलाने घरी आल्यावर वडिलांना रुग्णालयात नेले मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला. 
पोलिसांना माहिती मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले  घरातील सर्व सामान अस्तव्यस्त होते. चोरीच्या उद्धेशाने कोणीतरी शिरले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मयत पापा यांचा वाद आरोपीशी झाला असावा आणि त्यादरम्यान त्यांना चाकू मारण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस संशयिताचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रेंच कंपनीने एमएमआरडीएवर गंभीर आरोप केले,काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल