पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दिव्यांग, आजारी भाविक येतात. याची दखल घेऊन मंदिर समितीचे सदस्य ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाउंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 लाख रुपये किंमतीच्या 2 प्रदूषण विरहीत ई रिक्षा मंदिर समितीला देऊ केल्या आहेत. यामुळे आता भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी चौफला ते मंदिर व महाद्वार गेट ते मंदिर येथून रिक्षा प्रवास करता येणार असल्याने भाविकांचे दर्शन अधिक सुलभ होणार आहे.
या रिक्षात चार्जिंग बॅटरीचा वापर करण्यात आला असल्याने प्रदूषण होणार नाही. एका रिक्षात 8 भाविक बसून प्रवास करू शकतात. या रिक्षा फक्त चौफला ते मंदिर, महाद्वार गेट ते मंदिर या दरम्यानच धावणार आहेत.