Marathi Biodata Maker

अजित पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी! शरद पवार गटाचा दावा

Webdunia
गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (21:19 IST)
अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर चुकीची कागदपत्रे सादर करून दिशाभूल केल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिनिधीत्व केले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना शरद पवार गटावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार हे पक्षात हुकूमशाही राबवून आपल्या मनाला पटेल त्यांची परस्पर नियुक्ती करायचे. याच बरोबर शरद पवार यांचेराष्ट्रीय अध्यक्षपद बेकायदेशीर असल्याचा धक्कादायक युक्तिवाद करण्यात आला होता.
 
अजित पवार गटाच्या या युक्तिवादानंतर आज शरद पवार गटाने आपली बाजू मांडली. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना शरद पवार गटाची बाजू दोन तास लावून धरली. सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगात जवळपास दीड तास सुनावणी सुरु होती. आजच्या सुनावणीत पहिल्यांदाच युक्तिवादाला करताना आम्ही अनेक धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अजब गोष्टी निवडणूक आयोगासमोर मांडल्या. अजित पवार गटाने जे मुख्य दस्ताऐवज निवडणूक आयोगासमोर सादर केले होते, त्यापैकी 20 हजार प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी 8900 प्रतिज्ञापत्रांचा एक चार्ट बनवून निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. ” असा खुलासाही अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांसमोर दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

'रील्स'ची आवड असलेल्या ३ बहिणींनी एकाच कॅमेरामनशी केला विवाह; अमरोहामध्ये हिंदू संघटनांचा संताप

Hero MotoCorp ची बाईक ७,६३५ रुपयांनी झाली स्वस्त; नवी किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

"मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास सरकार जबाबदार ठरेल, कमकुवत नाही"; NEET वादावर अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

क्रूरतेची हद्द! आईसोबत झोपतो म्हणून लिव्ह-इन पार्टनरकडून ७ वर्षांच्या बालकाची लाटण्याने मारहाण करून हत्या

सुप्रिया सुले यांनी शेअर केला आई प्रतिभा पवार अन् सोनिया गांधींचा फोटो; सोशल मीडियात पोस्ट चर्चेत

पुढील लेख
Show comments