Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

40 वर्ष हमाली करूनही मला डावलत फडणवीसांना डोक्यावर आणून बसवलं-एकनाथ खडसे

Even after attacking me for 40 years
, रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:32 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत भाजपनं त्यांच्यावर अन्याय केल्याचं म्हटलं आहे.

"भाजपमध्ये चाळीस वर्षे हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं, पण मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यावर फडणवीसांना डोक्यावर बसवलं," असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
 
'हा नाथाभाऊ मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला होता, पण त्याचवेळी नाव वगळण्यात आलं आणि मला डावलून अन्याय केला,' असंही एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्यांना आम्ही घडवलं, पण तरीही सातत्यानं अपमान झाल्याचा आरोप खडसेंनी यावेळी बोलताना केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चुकीच्या डोस मुळे 2 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू