उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, "निवडणुका होणार नसतील, तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललं आहे. त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही कमतरता आणि चुका असतील त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल. त्यामुळे आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही."
राज्यातील पूरस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.
"राज्यात सरकार येऊन एक महिना झाला असून अद्यापही राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूर परिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणे आवश्यक आहे," असं शरद पवार म्हणाले.