करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन यंदा दहीहंडी उत्सव साजरा केला जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांना केलं आहे.
ज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले की करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव नेहमीच्या जल्लोषात होता कामा नये.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून राज्य सरकार पूर्ण मोकळीक देण्यास तयार नाही. मात्र छोट्या प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गोविंदा पथकांनी राज्य सरकारकडं केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांसोबत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला देशातून हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने संपूर्ण जगाला द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.