Festival Posters

सगळं बाहेर येईल : फडणवीस

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (09:37 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या निर्देशाप्रमाणे चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच, आपली भूमिकाही मांडली. मला या विषयावर बोलायचे नव्हते; पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे आहे; पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार आहे. कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येईलच. त्यासाठी एसआयटी चौकशी करावी, असे म्हटले.
 
महाराष्ट्र अशांत करण्यामागे कोण ते शोधून काढू : मुख्यमंत्री
जरांगेंच्या माध्यमातून आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र अशांत ठेवण्यामागे कोण कोण आहेत, याची एसआयटी चौकशी करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्यावरून विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. सत्ताधा-यांनी आक्रमक भूमिका घेऊन जरांगेच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन! मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, रोहित पवार आणि अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेत्यावर हल्ला; हल्लेखोराने मिठी मारून मानेवर वार केले

LIVE: पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी

ऑटो-टॅक्सी चालकांना ४,५०० शिक्षक मराठी शिकवतील; प्रताप सरनाईक यांची मोठी मोहीम जाहीर

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

पुढील लेख
Show comments