दिवसेंदिवस समोर येणारे परिक्षातील घोटाळ्याची तीव्रता ही अभ्यास करणाऱ्या युवकांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे. कारण वर्षानुवर्षे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विनाकारण आयुष्यातील ऐन उमेदीची वेळ हातातुन सुटताना पहावी लागत आहे. यासाठी सोसावा लागत असलेला अर्थिक बुर्दंड आणि मानसिक त्रास याची गणतीच करता येणार नाही. काही वेळापुर्वी समोर आलेल्या माहीतीनुसार आरोग्य विभागाच्या क गट परीक्षा आयोजनाची जबाबदारी असणाऱ्या न्यासा कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थींकडून बक्कळ पैसे घेत पेपर फोडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नागपूरचा एजंट निषीद रामहरी गायकवाड आणि अमरावतीचा राहुल धनराज लिंघोट यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
आरोग्य विभागाची झालेली गटड परीक्षेत घोटाळा झाल्याचे तर स्पष्ट झालेच आहे. याबरोबरच घोटाळ्यातील दिवसें – दिवस समोर येणारी माहिती सरळ सेवा व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि त्याचे पालक यांची मती कुंटीत करणारी आहे. आरोग्य विभाग ड गट आणि क गट परीक्षेतील गैरव्यवहार समोर आले असून या प्रकरणी आरोग्य विभागाचा सहसंचालक महेश बोटले, लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अंबाजोगाई आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी ड़ॉ.संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांनी क गट परीक्षेतही हात धुऊन घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घोटाळा प्रकरणी न्यासाचे अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडला असुन आरोग्य भरती परीक्षा घेण्याची जबाबदारी न्यासा कंपनीवर होती. तीन वर्षांपूर्वी एजंट सौरभ त्रिपाठी याने मंत्रालयातून न्यासा कंपनीला परीक्षा आयोजनाचे टेंडर मिळवून दिले. त्रिपाठीही सध्या अटकेत आहे. मात्र गैरव्यवहार उघडकीस आल्याने न्यासा कंपनीचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी तपास यंत्रणाच्या रडारवर आले आहेत.
छपाईच्या ठिकाणावरूनच ५०० पेपरचे वाटप
आरोग्य विभागात सहसंचालक पदावरील महेश बोटलेचा पेपर सेटसाठी समितीत समावेश आहे. त्यांनी छपाईच्या ठिकाणावरून प्रश्नपत्रिका फोडून त्याचे परीक्षेपूर्वीच सुमारे ५०० विद्यार्थ्यांना वाटप केले. यासाठी शेतीव्यवसाय करणारा निषीद गायकवाड, ट्रेडिंग व्यावसायिक राहुल लिंघोट यांच्यासह काही क्लासचालकांनाही त्यांनी हाताशी धरल्याची बाब तपासात समोर आली आहे. बोटलेने डॉ.बडगिरेच्या माध्यमातून एजंटशी संपर्क साधून पेपर पुरवल्याची माहिती आत्ता पर्यंत समोर आली आहे.