Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोल्हापूर राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला बेदम मारहाण!

कोल्हापूर राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला बेदम मारहाण!
, बुधवार, 3 जानेवारी 2024 (09:17 IST)
कारखान्याच्या राजकारणात संघर्षाची ठिणगी राजाराम कारखान्याचा राजकिय आखाडा तापत असताना  कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज कसबा बावड्यात घडली आहे. राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामात विरोधी गटातील ऊस उत्पादक सभासदांचा ऊस मुद्दाम डावलला जात असल्याचा आरोप करून त्यांना बावड्यातील मुख्य रस्त्यावर मारहाण केली.
 
राजाराम कारखान्याच्या झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली.यासंदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर दोन वेळा मोर्चे काढून त्यासंदर्भात निवेदनही दिले होते. पण यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला होता. आजच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात जाऊन पुन्हा याबाबतचे निवेदन दिले होते. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही या निवेदनाची दखल घेऊन कारखाना प्रशासनाकडे विचारणा केली होती.
 
दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस आपले काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोरच शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून यासंदर्भात जाब विचारला. यावेळी चटणीस आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालक यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. चिटणीस यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी तातडिने पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली.


Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने भारताचा एकदिवसीय मालिकेत 190 धावांनी पराभव केला