Publish Date: Sat, 05 Nov 2022 (13:36 IST)
Updated Date: Sat, 05 Nov 2022 (13:39 IST)
नाशिकरोड स्थानकावर शनिवारी सकाळी मुंबईहून जाणाऱ्या शालिमार एलटीटी एक्स्प्रेसच्या पार्सल व्हॅनला आग लागली. रेल्वेच्या इंजिनाशेजारी असलेल्या पार्सल व्हॅनला शनिवारी सकाळी 8.45 वाजता आग लागली. सुदैवाने पार्सल व्हॅनला आग लागली. यामुळे कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की प्रवासी डब्यातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सध्या आग विझवण्यात आली आहे. पार्सल व्हॅनला इतर डब्यांपासून वेगळे केले जात आहे. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
webdunia
Publish Date: Sat, 05 Nov 2022 (13:36 IST)
Updated Date: Sat, 05 Nov 2022 (13:39 IST)