Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

extortion case filed against nitesh rane
, शनिवार, 20 मे 2017 (13:17 IST)
काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू इथल्या हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप नितेश राणेंवर आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यानं नितेश राणे यांनी गुंड पाठवून तोडफोड केल्याचा आरोप केसवांनी यांनी केला आहे. दरम्यान, हॉटेलची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितेश राणे, मोईन शेख आणि महमद अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे हे हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांना भागीदारीसाठी धमकावत असल्याचा आरोप आहे. तसंच 10 लाख रुपयांची खंडणीही मागून, हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचा दावा, केसवानींनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले