Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

फडणवीस यांनी थेट दिला शब्द, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आपण बोलण्यास तयार

फडणवीस यांनी थेट दिला शब्द, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आपण बोलण्यास तयार
, गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (15:26 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरुमध्ये विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक कनेक्शनवरुन भाष्य करताना शिवसेने आमदार सुनील प्रभू यांनी राज्याच्या पार्यावरण मंत्र्यांनाही कर्नाटकमधून धमक्या आल्या होत्या अशी खळबळजनक माहिती सभागृहाला दिली. तसेच पुढे बोलताना कर्नाटकमध्ये भाजपाचं सरकार आहे असं प्रभू म्हणाले. यावरुन फडणवीस यांनी आक्षेप घेतला.प्रभू हे या प्रकरणाला राजकीय वळण देऊ पाहत असल्याचं फडणवीस म्हणाले. इतकचं नाही तर फडणवीस यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आपण बोलण्यास तयार असल्याचा शब्दही सभागृहाला दिला.
 
“राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातू अटक केली आहे. जो आरोपी कर्नाटकात सापडला त्यावरुन अनेक तर्कवितर्क सगळ्यांच्या मनात येऊ शकतात. याआधी दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यारे कर्नाटकशी संबंधित होते. तेव्हापासून कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे म्हणून की काय यांच्यामागे कोणती संस्था आहे याची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकारची दिली जाणारी धमकी आणि आरोपी यांचे सगळ्यांचे संबंध कर्नाटकाशी का आहेत याची माहिती मिळणे आवश्यक आहे. आदित्य ठाकरेंना धमकी देणारा आरोपी हा देखील कर्नाटकातील असल्याने हे जाणीवपूर्वक केलेल षडयंत्र आहे का? जर असे असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे,” असं प्रभू यांनी म्हटलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अद्यापही निर्णय नाही