suvichar

फडणवीस यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध

Webdunia
शनिवार, 10 एप्रिल 2021 (22:42 IST)
राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध असून शनिवार आणि रविवारी म्हणजेच विकेंडला लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्ण लॉकडाऊनला पर्याय दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटले. परंतु, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घ्या आणि मगच योग्य तो निर्णय घ्या, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे.
 
कोरोनामुळे मागील वर्ष वाया गेले. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनतेला कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.
 
छोटे व्यापारी आता पूर्णपणे संपले, तर ते पुन्हा उभे राहणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था वाढवण्यावर भर दिला पाहिजे असेही त्यांना वाटते. तसेच RTPCR रिपोर्टही तात्काळ दिला पाहिजे. रेमडेसीवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेही मत फडणवीस यांनी या बैठकीत व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments