Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:38 IST)
राज्यात सरकार नावाचं अस्तित्वच दिसत नाही. हे तीनचाकी सरकार बेईमानीने तयार झालेलं आहे आणि बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, असं  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला, असा आरोप देखील फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे स्थानिक निवडणुकीच्या प्रचारभेत ते बोलताना महाविकासआघाडी सरकारवर जाहीरपणे केला.
 
या प्रसंगी फडणवीस म्हणाले की, “ महाराष्ट्रातील अवस्था पाहून आता माध्यमं देखील म्हणायला लागली आहे की, महाराष्ट्रातील सरकार आहे कुठे? या सरकारचं अस्तित्वच आता दिसत नाही, अशाप्रकारची अवस्था आहे. तीनचाकी सरकार तिघाडी सरकार हे बेईमानीने तयार झालं, पण बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, तशी या सरकारची अवस्था आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मूळावर उठलेलं सरकार, अशी यांची अवस्था आहे.”
 
तसेच, “महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री, सत्ता पक्षांचे आमदार आहेत. पण महाराष्ट्रात सरकार नावाचं अस्तित्व शासन नावाचं अस्तित्व दिसत नाही. सरकार म्हणजे शासन म्हणजे काय असतं? गरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, ओबीसी, महिला, युवक या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, यांचा आक्रोश थांबवण्यासाठी जे कृती करतात त्याला सरकार किंवा शासन म्हटलं जातं. मात्र आता जे सरकारमध्ये आहेत त्यांना जनतेशी घेणंदेणं नाही. ते केवळ माल कमवत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत. एक प्रकारे माफियाराज अशाप्रकारची अवस्था  महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.” असं यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments