महाराष्ट्रातील नागपूरमध्ये नकली नोटा बनवणारी एक टोळी पकडली गेली आहे. ही टोळी एक लाख उपाये घेऊन त्याबदल्यात चार लाख रुपये देत होती. नागपूर पोलिसांनी या टोळीजवळून 25 लाख नकली नोटा जप्त केल्या आहे. सोबत चार लोकांना ताब्यात घेतले आहे. हे लोक सोशल मीडिया व्दारा लोकांना फसवत होते.
महाराष्ट्रातील नागपूर मध्ये पोलिसांनी अश्याच एका टोळीचा पर्दाफार्श केला आहे जे असली नोटांच्या बदल्यात नकली नोटा देत होते. टोळीतील हे लोक हायटेक पद्धतीने काम करीत होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करून त्यांना फसवत होते. हे रॅकेट लोकांना लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवत होते आणि फसवत होते.
नागपूर मधील एक व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीच्या संपर्कात आले. या टोळीने त्या व्यक्तीशी व्हाटसअप व्दारा संपर्क साधून एक लाख रुपये मागितले व त्याबदल्यात चार लाख रुपये देण्याचे वाचन दिले. या टोळीजवळ बनावट नोटा छापायचे मशीन देखील होते. त्या व्यक्तीला या टोळीबद्दल संशय आला व त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी मोठ्या हुशारीने या रॅकेटचा पर्दाफार्श केला व या टोळीला ताब्यात घेतले. पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहे.
Edited By- Dhanashri Naik