Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावतीमध्ये बनावट शिधापत्रिका रद्द, मिशन सुधार अभियानांतर्गत मोठी कारवाई

Ration Card Rules
अमरावती जिल्ह्यात मिशन सुधार अभियानांतर्गत १२,२७५ बनावट, अपात्र, मृत आणि निष्क्रिय शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहे. तसेच आतापर्यंत १५,५६९ लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शासनाची सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन सुधार अभियानाचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पडताळणीदरम्यान, १२,२७५ अपात्र, बनावट, मृत, हस्तांतरित आणि निष्क्रिय शिधापत्रिका धारकांची नावे शिधावाटप यादीतून काढून टाकण्यात आली आहे आणि त्यांचे अन्नधान्य वितरण तात्काळ थांबवण्यात आले आहे.
 
जिल्हा पुरवठा विभागाला तपासासाठी ४१,१३० संशयास्पद शिधापत्रिका प्राप्त झाल्या. यापैकी, आतापर्यंत १५,५६९ लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तपासणीत केवळ ३,२९६ पात्र लाभार्थी, तर १२,२७५ अपात्र असल्याचे आढळून आले. सर्वात धक्कादायक परिस्थिती अमरावती शहर आणि नगरपालिका क्षेत्रात समोर आली आहे. प्राप्त झालेल्या १२,३०६ संशयास्पद शिधापत्रिकांपैकी ४,१२५ तपासण्यात आल्या, आणि त्यात ४,०९२ लाभार्थी अपात्र, तर केवळ ७० पात्र असल्याचे आढळून आले.
प्रशासनाचे म्हणणे आहे की, या मोहिमेमुळे बनावट लाभार्थ्यांना प्रतिबंध बसेल, काळाबाजार रोखला जाईल आणि अन्नधान्याचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ETPL 2026 full schedule : नवीन टी२० लीगचे वेळापत्रक जाहीर झाले असून संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या