नाशिक मध्ये पिंपळगाव येथे बसवंत बाजार समितीमध्ये 2 दिवसापूर्वी कांद्या व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे मुंबई एपीएमसी कांदा बटाटा बाजारपेठ्यात कांद्याच्या दरात 15 रुपयांनी घट झाली. दोन दिवसापूर्वी कांद्याचा भाव 40 रुपये किलो होता आज त्याचा भाव 25 रुपये किलो झाला आहे. आज मुंबई कांदाबटाटा मार्केट मध्ये 100 गाडयांची आवक झाली आहे.
आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यामुळे मोठ्या प्रमाणात 100 कोटीची रकम जप्त केली. या छाप्यामुळे कांदा दरात सरासरी 150 ते 200 रुपयांची घसरण झाली असून, याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थतीत परराज्यातून जुन्या कांद्याची मागणी झपाट्याने वाढत असून, बाजारात कांद्याचे भावही वाढले आहेत किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 45 ते 55 रुपये किलो आहे.
सणासुदीच्या काळात कांदा दर साडेचार हजार रुपये क्विंटल वर गेल्याने आयकर विभागाने कांद्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहे. या मुळे कांद्याच्या दरात घसरण झाली असून शेतकरींना मोठा आर्थिक फटका बसला आहे.