Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

eknath shinde
, शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:47 IST)
राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.  
 
याबाबत मिळाल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात.  
 
अशातच नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.
 
यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधी 12 मार्चला नाशकात; श्री काळारामाची करणार आरती