Festival Posters

नाशिक : किसान परिषद, सरकारला दिली दोन दिवसांची मुदत

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2017 (10:48 IST)
राज्यातील शेतकरी संपाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या किसान परिषदेत शेतकऱ्यानी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत आंदोलन अजून मोठे करत राष्ट्रव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात १२ जूनला राज्यात तहसील आणि जिल्ह्याधिकारी कार्यालयांना धरणे देण्यात येणार आहेत. तर १३ जूनला सर्वत्र चक्काजाम, रेलरोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी परिषदेच्या मंचावर सरकारमध्ये सामील असलेले खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चु कडू, तर कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप व्यासपीठावर कसे असा प्रश्न करत एका महिला कार्यकर्तीने व्यासपीठावर माईकचा ताबा घेतला. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडला होता.

शेतकरी वर्गाने ऐतिहासिक संप पुरल्यानंतर त्यात फुट पडली. गुरुवारी काही बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरू झाले. मात्र अद्यापही शेतकऱ्याचा एक गट संपावर ठाम आहे. याच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमधील तूपसाखरे लॉन्सवर सर्व शेतकरी संघटनांची परिषद पार पडली. सुरुवातीला सुकाणू समितीची बैठक झाली त्यानंतर परिषद झाली.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; कोकण विभागासाठी यलो अलर्ट जारी

LIVE: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता

जोजिला पासवर वाहनावर हिमस्खलन, ६ ठार, ५ जखमी; बचावकार्य सुरू

महाराष्ट्रात इंधनाच्या तुटवड्याच्या अफवांकडे लक्ष देऊ नका," असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः महत्त्वाची माहिती दिली

मंत्री नरहरी झिरवाल वायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments