Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार आम्हाला इच्छामरण द्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागितली परवानगी

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2019 (09:51 IST)
नगर येथील जामखेड तालुक्यातील खर्डा भागातील अमृतलिंग लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याचे काम नवीन आराखड्यानुसार करावे, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे निवेदन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी जामखेडच्या तहसिलदारांना दिले. नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली, खर्डा, नागोबाचीवाडी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या अमृतलिंग प्रकल्पाच्या कामास ६ मे १९९९ रोजी मंजुरी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या जमीनीही संपादीत झाल्या. मात्र जमीनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती. भरपाई मिळावी, यासाठी एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने खर्डा येथे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अमृतलिंग प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष गेले होते. निधीअभावी या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. आमदार प्रा. राम शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमांतून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु, निधी आल्यानंतर तलावाच्या सांडव्याचे सुरू असलेले काम सदोष असल्याच्या तक्रारी मागील १९ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांकडून होत आहेत. सांडव्याच्या सदोष कामामुळे उरलेल्या जमीनी पाण्यात जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे.आजघडीला अमृतलिंग प्रकल्पाचा सदोष पद्धतीने सांडवा झाल्यास प्रकल्प भरल्यानंतर पाणी वेगांत येऊन गट नं. १२७ मधील शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर असे झाले तर आधीच प्रकल्पबाधीत असणारे शेतकरी पुर्णपणे भूमीहीन होतील. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या निवेदनावर प्रमोद सुर्वे, रामहरी खाडे,सुर्यभान खाडे, संजय सुर्वे, बापू सुर्वे आधी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

इंडोनेशियामध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

नागपूर : मोहन भागवत यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनी आरएसएसच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला

पुण्यात ३१ ऑगस्टपर्यंत वाहतूक चलन थांबवले; वाहतूक कोंडी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे पोलीस आयुक्त यांचे आदेश

८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा; ठाण्यात एकनाथ शिंदे आणि बीडमध्ये सुनेत्रा पवार यांनी तिरंगा फडकवला

Independence Day 2026 मुख्यमंत्री फडणवीस यांनी सचिवालयात ध्वजारोहण केले तर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुण्यात तिरंगा फडकवला

पुढील लेख
Show comments