Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका ,एमएसईबी सब स्टेशन पेटवले

Farmers' agitation erupts in Sangli
, सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (09:41 IST)
सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी करत आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी 10 तास वीज मिळावी. ही मागणी घेऊन शेतकरी कोल्हापुरातील महावितरण कार्यालायासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेकतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. 
 
गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरु असता. अद्याप या वर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या आंदोलनाची धग आता सांगलीत देखील पाहायला मिळाली. सांगलीत अज्ञात शेतकऱ्यांनी वीज मागणी घेऊन आक्रामक होऊन सांगली जिल्ह्यातील सांगली-इस्लामपूर मार्गावरील कसबे डिग्रज येथील असलेले एमएसईबी सब स्टेशन पेटवले आहे. या शेतकरी आंदोलनाचा भडका अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शेतकऱ्यांनी MSEB चे सब स्टेशन पेटवल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आगीत कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे असून त्यात असलेले इतर साहित्य देखील जळून खाक झाले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे जिल्हा कोरोना आढावा बैठक शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करा ,जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्यात यावे असे निर्णय