शेतकऱ्यांसाठी व मका उत्पादकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण आता मका उत्पादकांना मकेच्या दराबाबत सुखद धक्का मिळू शकतो. कारण मकेला दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आता मका उत्पादकांना चांगला भाव मिळू शकतो. चला तर मग मकेचे दर का वाढू शकतात ते जाणून घेऊया.
कशामुळे मकेच्या दरात होणार वाढ?
रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. परंतु तरी देखील तुर्कीद्वारे रशिया गहू व मकेची निर्यात करत आहे. ज्याचं कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत मकेला प्रचंड मागणी आहे. हे एक मक्याची दरवाढ होण्याचं महत्वाचं कारण आहे.
रशियाने केली निर्यात दरात वाढ
रशियाने मकेच्या निर्यात दरात वाढ केली आहे. तर यापूर्वी मकेच्या निर्यातीवर रशियाच्या रुबल या चलनानुसार, 2196 रुपये प्रतिटन निर्यात शुल्क होते. मात्र, त्यात वाढ होऊन 3075 रुबल (रुपये) करण्यात आलं आहे. खरं तर, रशिया युक्रेन युद्धामुळे पुरवठा जर ठप्प राहिला तर मकेच्या दरात आणखी विक्रमी वाढ होऊ शकते.
यंदाही मका उत्पादनात वाढ गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखील मकेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. ज्याचा प्रमुख कारण म्हणजे मकेसाठी यंदा चांगले पोषक वातावरण प्राप्त झाले आहे.
सध्या मकेला किती मिळतोय भाव?
सरकारकडून मकेला 1870 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतू, खुल्या बाजारामध्ये मकेची 2500 ते 2600 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. म्हणजेच माकेला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी देखील आनंदात आहे. रशिया युक्रेनचा पुरवठा ठप्प राहिल्यास मकेचा दर 2800 ते 3 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.